Pre Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज; कोकण आणि विदर्भात ५ दिवस मुसळधारेची शक्यता

Monsoon Update Maharashtra : राज्यातील अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, आणि ठाणे जिल्ह्यात पुढील ५ दिवस बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

अनिल जाधव

Pune News : माॅन्सून अजूनही पुढे सरकला नाही. पण माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील २ दिवसात माॅन्सून विदर्भासहीत इतर भागात प्रवेश करेल. तसेच राज्यात पुढील २ दिवस बहुतांशी बागात जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

राज्यातील अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, आणि ठाणे जिल्ह्यात पुढील ५ दिवस बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.

तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.

विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे.

रविवारपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागात जोरदार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सून पुढील २ दिवसांमध्ये विदर्भातील आणखी काही भागात दाखल होईल. तसेच छत्तीसगड आणि ओडिशाच्याही काही भागात माॅन्सून प्रगती करेल. तर गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमधील काही भागात माॅन्सून पुढील ३ दिवसांमध्ये दाखल होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT