Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update : मॉन्सून घेतोय महाराष्ट्राकडे धाव

Weather Update : पुढील चार दिवसांपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Team Agrowon

Pune News : अरबी समुद्रातून प्रवाहाचा वेग कायम असल्याने नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वाटचाल सुरूच ठेवली आहे. सोमवारी (ता. ३) मॉन्सूनने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. पुढील चार दिवसांपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

केरळमध्ये मॉन्सून वेळेआधी (३० जून) दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल सुरूच आहे. रविवारी (ता. २) दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली होती.

संपूर्ण केरळ, तमिळनाडू व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकमधील मंगळूरू, चित्रदुर्ग ते आंध्र प्रदेशातील नेल्लूर पर्यंतच्या भागापर्यंत मजल मारली होती. बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली.

सोमवारी (ता. ३) मॉन्सूनच्या वाटचालीचा वेग सुरूच होता. मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकातील होन्नावर, बेल्लारी आंध्र प्रदेशातील कर्नूल, तेलंगणातील नरसापूर पर्यंत प्रगती केली.

पुढील चार दिवसांत मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, रायलसिमा, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा उर्वरित भाग, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशाचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT