Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : वायव्य भारतातून मॉन्सून परतला

Latest Monsoon Update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) थांबलेली परतीची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे.

Team Agrowon

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) थांबलेली परतीची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. राजस्थानच्या आणखी काही भाग, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्लीसह, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

यंदाही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सूनने राजस्थानातून काढता पाय घेतला आहे.

सोमवारी (ता. २५) मॉन्सूनने नैर्ऋत्य राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरवात केली. परतीची वाटचाल काहीशी थबकल्यानंतर शनिवारी (ता. ३०) मॉन्सूनने गुलमर्ग, धरमशाला, पंतनगर, मोरेना, सवाई माधवपूर, जोधपूर, बारमेर पर्यंतच्या भागातून माघार घेतली आहे.

तीन दिवसांत आणखी काही भागांतून परतणार

परतीस पोषक स्थिती असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित राजस्थानसह, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्य, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT