Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : माॅन्सून सरी आज कोणत्या भागात होण्याचा अंदाज?

Monsoon Update : देशातील बहुतांशी भागांमध्ये माॅन्सून दाखल झाला. पण माॅन्सून सरींपासून बहुतांशी भाग वंचित आहे. राज्यातील अनेक भागातही पावसाची दडी कायम आहे.

Team Agrowon

Weather Update : देशातील बहुतांशी भागांमध्ये माॅन्सून दाखल झाला. पण माॅन्सून सरींपासून बहुतांशी भाग वंचित आहे. राज्यातील अनेक भागातही पावसाची दडी कायम आहे. तर काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला. आजही राज्याच्या काही भागांमध्ये माॅन्सून सरी होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.

माॅन्सूनने देशाचा बहुतांशी भाग व्यापला आहे. केवळ राजस्थानचा काही भाग माॅन्सूनने अद्याप व्यापायचा आहे. तसेच पंजाबचा थोडा भाग आणि हरियानाच्या काही भागात माॅन्सून पोचला नाही.

देशाच्या अगदी थोड्या भागात माॅन्सून पोचला नाही. उर्वरित भाग माॅन्सूनने व्यापला. देशात माॅन्सूनने रविवार ते बुधवार या काळात चांगली प्रगती केली होती. बुधवारी माॅन्सूनने राजस्थानच्या काही भागात प्रगती केली होती. तसेच उत्तर अरबी समुद्राचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला होता. माॅन्सूनची सिमा बिकानेर, नरनौल, फिरोजपूरपर्यंत होती.

पण काल आणि आज माॅन्सूनने प्रगती केली नाही. माॅन्सून एकाच भागात होता. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी सध्या पोषक हवामान आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून राजस्थान, हरियाना आणि पंजाबचा उरलेला भाग व्यापेल. म्हणजेच संपूर्ण भारत दोन दिवसांमध्ये माॅन्सूनने व्यापलेला असेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला.

देशातील अनेक भागात सध्या माॅन्सूनचा पाऊस पडत आहे. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी पावसाच्या सरी होत आहेत. तर विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी सुरु आहे.

आज राज्यातील पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील बहुतांशी भागांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर रत्नागिरी, सातारा, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kerala Assmbly : व्हीबी-जी राम जी रद्द करून मनरेगा योजना लागू करा; केरळ विधानसभेत ठराव मंजूर

Post Harvest Value Addition: कर्नाटकात भात पीक काढणीपश्चात मूल्यवर्धनाचं मॉडेल, चार-पाच पट अधिक उत्पन्नाची हमी

Rural Governance: गावगाड्याचा विकास कधीपर्यंत वाऱ्यावर?

India US Trade Deal: ...तर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, भारत- अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा

Agricultural Waste : पिकांच्या काढणीनंतर उरलेल्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्याची होणार निर्मिती; शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न?

SCROLL FOR NEXT