Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update : अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल सुरू

Monsoon Rain : पुढील तीन दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यातच अरबी समुद्रातून थबकलेली वाटचाल पुन्हा सुरू झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अमोल कुटे

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार केरळमधील आगमनाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. पुढील तीन दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

यातच अरबी समुद्रातून थबकलेली वाटचाल पुन्हा सुरू झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. चांगल्या पावसाच्या भाकिताने मॉन्सूनच्या स्वागताची ओढ लागली आहे. बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटसमूह आणि अरबी समुद्रातील मालदीवमध्ये १९ मे रोजी मॉन्सूनचे आगमन झाले.

त्यानंतर श्रीलंकेच्या बहुतांश भागासह अंदमान बेट समूह मॉन्सूनने व्यापला. यात दरम्यान उपसागरातील ‘रेमल’ चक्रीवादळामुळे चाल मिळाल्याने रविवारी (ता. २६) मॉन्सूनने बंगालच्या उपसागराच्या आणखी भागात प्रगती केली. दुसरीकडे २४ मेपासून अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल थबकली होती.

मंगळवारी (ता. २८) मॉन्सूनची अरबी समुद्रातून वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्र आणि मालदीवच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. मॉन्सून ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे.

पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्राच्या आणखी काही भागासह लक्षद्वीप बेटांवर मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT