Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : माॅन्सून आणखी काही भागात दाखल; माॅन्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती; राज्यात पावसाचा अंदाज

Rain Update : शेतकऱ्यांना आतुरता असलेल्या माॅन्सूनचा प्रवास वेगाने सुरु आहे. दोन दिवस एकाच जागेवर मुक्काम केल्यानंतर माॅन्सूनने आज काही भागात प्रगती केली.

Anil Jadhao 

Pune News : शेतकऱ्यांना आतुरता असलेल्या माॅन्सूनचा प्रवास वेगाने सुरु आहे. दोन दिवस एकाच जागेवर मुक्काम केल्यानंतर माॅन्सूनने आज काही भागात प्रगती केली. तर राज्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी उष्णता आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

गेले वर्षभर दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या माॅन्सूनची आतुरता आहे. माॅन्सूनचा आतापर्यंतचा प्रवासही वेळेवर दिसतो आहे. माॅन्सूनने आज दक्षिण अरबी समुद्र, मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरीन भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबारच्या आणखी काही भागात माॅन्सूनने प्रगती केली. तसेच माॅन्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान असल्याचेही हवामान विभगााने म्हटले आहे. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, अंदामान आणि निकोबर बेटांचा उर्ववरित भाग, अंदमान समुद्राचा संपूर्ण भाग व्यापेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. दक्षिण केरळ भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे या भागात आणि शेजारच्या भागात पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागात पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला. पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. आज कोकणातील रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईत काही ठिकाणी उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा तसेच विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्या म्हणजेच गुरुवारी विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ आणि मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली यासोबतच सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर तसेच सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. शुक्रवारी आणि शनिवारीही काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT