Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Update: मॉन्सूनने बहुतांश श्रीलंका व्यापली

Indian Monsoon Progress: यंदाचा मॉन्सून सर्वसाधारण वेळेपेक्षा पाच दिवस आधीच दाखल होत वेगाने पुढे सरकत आहे. श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापल्यानंतर आता केरळसह दक्षिण भारतात लवकरच आगमनाची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २०) पुढे वाटचाल करत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरीन, तसेच बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला आहे. येत्या रविवारपर्यंत (ता. २५) मॉन्सून केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला.

सोमवारी (ता. १९) प्रगती कायम ठेवत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या बऱ्याचशा भागापर्यंत मजल मारली होती. बंगालच्या उपसागरातही आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती सुरूच ठेवली आहे.

मंगळवारी (ता.२१) श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापणाऱ्या मॉन्सूनचा पुढील प्रवास वेगाने होण्याची शक्यता असल्याने पुढील तीन ते चार दिवसांत संपूर्ण मालदीव, कोमोरीन उर्वरित भागासह, लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडूसह, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि पूर्वोत्तर राज्याच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT