Monsoon Agrowon
हवामान

Monsoon 2025: मॉन्सूनने अंदमान बेटे व्यापली

Weather Update: यंदाचा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास सर्वसाधारण वेळेपेक्षा वेगवान असून, शनिवारी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांवर हजेरी लावली. अरबी समुद्र, मालदीव आणि दक्षिण श्रीलंकेतही मॉन्सूनने जोरदार प्रवेश केला आहे.

अमोल कुटे

Pune News: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता. १७) संपूर्ण अंदमान -निकोबार बेट समूह व्यापला असून, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. अरबी समुद्रातून चाल करत मालदीव आणि कोमोरीनच्या आणखी काही भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच १३ मे रोजी मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल सुरूच असून, गुरुवारी (ता. १५) मॉन्सूनने दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव आणि भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचा कोमोरिन भाग व श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत मॉन्सूनने प्रगती केली होती.

त्यानंतर शनिवारी (ता. १७) मॉन्सूनने आणखी चाल केली आहे. वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा प्रवास वेगाने होत असून, मॉन्सून केरळातील आगमनाची प्रतीक्षा आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे संकेत

पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत बुधवारपर्यंत (ता. २१) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरुवारपर्यंत (ता. २२) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. उत्तरेकडे जाताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT