Monsoon Agrowon
हवामान

Monsoon Rain : आठवडाभरानंतरही माॅन्सून एकाच जागेवर; विदर्भात पुढील ४ दिवस काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज

Weather Update : हवामान विभागाने कोकण आणि विदर्भात पुढील ४ दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला.

Anil Jadhao 

Pune News : माॅन्सूनचा प्रवास तब्बल आठवडाभरानंतरही थबकलेला होता. तर राज्यातील बहुतांशी ठिकाणी केवळ ऊन सावल्यांचा खेळ सुरु आहे. हवामान विभागाने कोकण आणि विदर्भात पुढील ४ दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला.

राज्याच्या अनेक भागात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तर अनेक ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ सुरु होता. हवामान विभगााने आज राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला होता. आज विदर्भ आणि कोकणात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता.

तसेच मराठवाडा आणि इतर भागात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भ आणि कोकणात पुढील ४ ही दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर उद्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यातील अनेक भागात पावसाची राहू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

माॅन्सूननचा रखडेला प्रवास आजही कायम होता. माॅन्सून जवळपास आठडाभर एकाच जागेवर ठाण मांडून आहे. माॅन्सूनची राज्यातील सिमा जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत आहे. माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, माॅन्सूनने बुधवारनंतर राज्यात मुक्काम केला आहे. माॅन्सूनची राज्यातील सिमा जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत आहे. माॅन्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढीच्या २ ते ३ दिवसांमध्ये माॅन्सून ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT