Rain Agrowon
हवामान

Monsoon Update: मॉन्सून 'जैसे थे'; राज्यातील २६ जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा 

Maharashtra Monsoon Update: राज्यात मॉन्सूनने वेळेआधी हजेरी लावली असली तरी गेल्या आठवड्याभरापासून त्याची वाटचाल ठप्प झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढत असून, काही भागांत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

Pune News: मॉन्सूनचे प्रवाह कमजोर झाल्याने मॉन्सूनची वाटचाल रखडली आहे. मॉन्सून मागील ८ दिवसांपासून एकाच भागात मुक्कामी आहे. राज्यात बहुतांश भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. परंतु राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झालं आहे. राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच राहतील, असा अंदाज आहे.

आज कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात वीजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मॉन्सून मुंबई, अहिल्यानगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहचलेला आहे. परंतु त्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल थिजली आहे. मॉन्सूनची सीमा आजही मुंबई, अहिल्यानगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागात कायम आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने पारा उकाडा जाणवत आहे. मागील चोवीस तासात ब्रम्हपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४०.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीबद्दल हवामान विभागाने काहीही संकेत दिले नाहीत.

यंदा मॉन्सूनने नियोजित आणि सरासरी वेळेच्या आधीच महाराष्ट्रात प्रवेश केला. परंतु मागील ८ दिवसांपासून मॉन्सूनचा प्रवास थांबला आहे. परंतु राज्यात मात्र पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT