Pune News : राज्यात गुलाबी थंडीची प्रतिक्षा असतानाच, पावसाला पोषक वातावरण होत आहे. गुरूवारपासून (ता. २३) राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. यातच राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असल्याने गारठा कमी होण्याची शक्यता आहे. आज (ता. २१) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
भारताच्या दक्षिणेकडील कोमोरीन भागाकडे असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. श्रीलंकेपासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. राज्यात आकाश अंशतः ढगाळ होत असून, पावसाला पोषक हवामान होत असल्याने तापमानात वाढ होत आहे.
सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३४ अंशाच्या खाली आला आहे.
किमान तापमानात वाढ झाली असून, पारा पुन्हा १६ अंशांपार गेला आहे. सोमवारी (ता. २०) गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे.
सोमवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.६ (१८.५), जळगाव ३२.७ (१६.५), कोल्हापूर ३१.५ (२०.६), महाबळेश्वर २६.६ (१६.६), नाशिक ३१.९ (२१.०), निफाड ३१.७ (१६.१), सांगली ३१.७ (२०.३), सातारा ३२.० (१९.६), सोलापूर ३३.८(२१.४), सांताक्रूझ ३३.९ (२४.४), डहाणू ३४.० (२२.४), रत्नागिरी ३५.६ (२३.६),
छत्रपती संभाजीनगर ३१.६ (१८.६), नांदेड ३२.६ (१९.०), परभणी ३२.४ (१८.१), अकोला ३३.४ (१९.१), अमरावती ३२.६ (१८.१), बुलढाणा ३०.६ (१८.६), ब्रह्मपूरी ३४.९ (१९.०), चंद्रपूर ३२.०(१६.४), गडचिरोली ३२.० (१५.६), गोंदिया ३१.७ (१६.०), नागपूर ३२.०(१७.३), वर्धा ३१.८(१८.०), वाशीम ३३.६(१७.४), यवतमाळ ३४.० (१७.०).
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.