Winter Season Agrowon
हवामान

Maharashtra Cold Wave Alert : "विदर्भात किमान तापमानात घट; थंडीचा जोर वाढण्याची शक्यता"

Vidarbha Weather Update : आज (ता. ३१) विदर्भात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात अवकाळी पावसाने उघडीप दिली असली तरी अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान कायम आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे थंडी कमी झाली असून, उकाडा वाढल्याचे अनुभवायला मिळत आहे. आज (ता. ३१) विदर्भात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती, त्यापासून उत्तर गुजरातपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा तसेच आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा या सर्व प्रणाली निवळून गेल्या आहेत. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अद्यापही कमीच आहे. सोमवारी (ता. ३०) राजस्थानच्या ‘चित्तोडगड’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पावसाळी वातावरणामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. सोमवारी (ता. ३०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात येथे नीचांकी १३.६ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात पावसासह गारपिटीने तडाखा दिल्यानंतर राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे. आजपासून (ता. ३१) विदर्भाच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.६ (१७.६), अहिल्यानगर ३०.१ (१७.५), धुळे २७.५ (१३.६), जळगाव २७.४ (१६.२), जेऊर ३२.५ (१६.५), कोल्हापूर ३०.६ (१८.७), महाबळेश्वर २६.१ (१५.६), मालेगाव २७.८ (१७), नाशिक २९.४ (१७.७), निफाड २६.६ (१६.१), सांगली ३१.७ (१७.७), सातारा ३०.९ (१८.२), सोलापूर ३३ (२०.१), सांताक्रूझ ३३.५ (२०.३),

डहाणू २८.८ (१९.१), रत्नागिरी ३३ (२२.१), छत्रपती संभाजीनगर २९.८ (१८.१), धाराशिव २९.७ (१६.८), परभणी ३०.५ (१८), परभणी कृषी विद्यापीठ ३०.२ (१५.२), अकोला ३०.४ (१९.४), अमरावती २९.२ (१८.३), भंडारा २७.६ (१७), बुलडाणा २८.५ (१८), ब्रह्मपुरी ३२ (१८), चंद्रपूर २९.६ (-), गडचिरोली २८.६ (१७.२), गोंदिया ३०.२ (१६.३), नागपूर २८.९ (१७.८), वर्धा २८.९ (१८.४), वाशीम ३०.२ (१९.२), यवतमाळ ३१.५ (-).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT