Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानात घट होण्याची शक्यता

Weather Forecast : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे कमी झालेली थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाशामुळे कमी झालेली थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. १३) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्चिम - मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात थायलंडच्या आखातामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. उद्यापर्यंत (ता. १४) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिमेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे.

राज्यातील ढगाळ हवामान निवळताच कमाल तापमानात वाढ झाली असून, किमान तापमानाचा पारा कमी होऊ लागला आहे. रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात कमाल तापमान ३० ते ३६ अंशाच्या दरम्यान आहे.

किमान तापमानात घट झाल्याने निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.५ (१७.७), जळगाव ३५.० (१७.०), कोल्हापूर ३१.२ (२०.६), महाबळेश्वर २४.७ (१७.३), नाशिक ३२.३ (१७.४), निफाड ३३.० (१५.८), सांगली ३०.९ (२०.२), सातारा ३२.८ (१९.४), सोलापूर ३३.४ (२१.५), सांताक्रूझ ३६.३ (२३.६), डहाणू ३३.५ (२३.३), रत्नागिरी ३६.२ (२४.३),

छत्रपती संभाजीनगर ३३.६ (१६.२), नांदेड ३३.६ (१९.६), परभणी ३३.६ (१८.५), अकोला ३५.३ (१८.२), अमरावती ३३.४ (१८.७), बुलढाणा ३३.५ (१९.२), ब्रह्मपूरी ३४.०(१९.८), चंद्रपूर ३२.६(१७.६), गडचिरोली ३३.२ (१६.०), गोंदिया ३३.१ (१७.६), नागपूर ३३.५(१७.२), वर्धा ३३.६(१९.०), वाशीम ३३.८(१७.०) यवतमाळ ३५.२ (१७.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या आवारात विरोधक- सत्ताधारी आमने- सामने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी ठप्प

Marathwada Rain: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत हलका ते दमदार पाऊस

Okra Farming: भुसावळात प्रसिद्ध मयूरभाऊंची भेंडी

Desi Cucumber Seeds: अनेक वर्षांपासून जोपासलेले देशी काकडीचे बियाणे

Protest Movement: दगडाहून कठोर हे सरकार

SCROLL FOR NEXT