Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : जळगावात किमान तापमान १४ अंश सेल्सिअसखाली

Cold Weather : खानदेशात किमान तापमन १४ अंश सेल्सिअसखाली आले आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात किमान तापमन १४ अंश सेल्सिअसखाली आले आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना लाभ होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात थंडी होती. परंतु मागील मंगळवारी (ता. २३) रात्री वातावरणात चांगलाच गारठा तयार झाला. सायंकाळनंतर मंद गार वारे सुटले. यानंतर मध्यरात्री किमान तापमान १४ अंश सेल्सिअसखाली पोहोचले.

या मोसमात प्रथमच किमान तापमान १४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याची नोंद जळगाव येथील कृषी संशोधन केंद्राचे हवामान केंद्र, धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रात झाली. यंदा थंडी सुरुवातीपासून चांगली राहणार, असल्याचे चित्र असल्याने शेतकऱ्यांतही उत्साह आहे. कारण याचा कोरडवाहू रब्बी पिकांचा चांगला लाभ होईल. हुडहुडी भरविणारी थंडी मागील वर्षी नसल्याने कोरडवाहू रब्बी पिकांचे नुकसानही सुरुवातीला झाले.

यातच या महिन्यात काही दिवस ढगाळ वातावरण तयार झाले. मध्यंतरी सात ते आठ दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे कोरडवाहू रब्बी पिकांमध्ये हरभरा, दादर ज्वारीचे बीजांकुरण कसे होईल, त्यात यश मिळेल की नाही, असा संभ्रम होता. प्रतिकूल स्थितीत इतर पिकांतही रोगाची समस्या दिसत होती.

एन पेरणी, केळी व इतर पिकांच्या वाढीच्या वेळेस थंडीची गरज होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून थंडी पडत आहे. गुरुवारी (ता. २७) किमान तापमान १४ अंश सेल्सिअस यादरम्यान होते.

गारठा तयार होत अससल्यामुळे रब्बी पिके जोमात येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. थंडी वाढेल किंवा कायम राहील, हे लक्षात घेता अनेक केळी उत्पादकांनी पिकाला रात्रीच्या वेळेस पाणी देण्याचे नियोजन केले आहे.

थंडी यंदा कमी आहे. परंतु आता थंडी पडत असल्याने रब्बी पिकांना बऱ्यापैकी लाभ होईल, असे दिसत आहे. थंडी असल्यास विविध रब्बी पिकांत सिंचनाची गरजही कमी असणार आहे.
- रमेश पाटील, शेतकरी, चोपडा (जि. जळगाव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT