Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट

Cold Season : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे.

Team Agrowon

Maharashtra Weather Forecast : पुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातही किमान तापमानात घट झाली आहे. आज (ता. १३) उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्यात आकाश निरभ्र होत असून, पहाटे गारठा वाढला असून, दुपारी मात्र ऊन असल्याचे दिसून येत आहे. पहाटे तुरळक धुके आणि दव पडल्याचे चित्र कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ-घट होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे देशातील उच्चांकी ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान २४ ते ३१ अंशांच्या दरम्यान होते. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि चंद्रपूर येथे राज्यातील नीचांकी १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३१.० (१५.७), जळगाव २९.५ (१५.९), कोल्हापूर ३०.२ (१९.०), महाबळेश्वर २६.६ (१५.५), नाशिक ३०.३ (१४.०), निफाड २९.० (१३.०), सांगली ३०.१ (१७.९), सातारा ३०.४ (१७.४), सोलापूर ३२.२(१७.३), सांताक्रूझ ३३.१ (२०.५), डहाणू ३०.३ (१९.८), रत्नागिरी ३५.५ (२२.१), छत्रपती संभाजीनगर २९.० (१५.४), नांदेड २९.६ (१६.२), परभणी ३०.० (१६.०), अकोला ३०.२ (१६.४), अमरावती २८.६ (१५.३), बुलढाणा २९.३ (१४.६), ब्रह्मपुरी ३१.१ (१४.९), चंद्रपूर २८.२(१३.०), गडचिरोली २९.६ (१३.२), गोंदिया २६.९ (१३.२), नागपूर २८.०(१४.४), वर्धा २८.०(१४.५), वाशीम ३०.२ (१४.४), यवतमाळ ३०.५ (१६.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT