Winter Season Agrowon
हवामान

Weekly Weather : सौम्य थंडीची शक्यता; ढगाळ हवामान

Weather Forecast : थंडीच्या प्रमाणात चढउतार जावणेल. हवेचे दाब कमी होतात, तेव्हा तापमानात वाढ झालेली असते. त्यामुळेच सौम्य थंडीची शक्यता राहील.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Agricultural Weather : महाराष्ट्रावर या आठवड्याचे पूर्वार्धात १०१० हेप्टापास्कल, तर गुरुवार (ता. १२) पासून पुन्हा हवेचे दाब कमी होऊन १००८ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यामुळे थंडीच्या प्रमाणात चढउतार जावणेल. हवेचे दाब कमी होतात, तेव्हा तापमानात वाढ झालेली असते. त्यामुळेच सौम्य थंडीची शक्यता राहील.

हवामान ढगाळ राहण्यामुळे थंडीवर परिणाम होऊन हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील.

महाराष्ट्रातील विविध विभागात वाऱ्याच्या दिशेत बदल होतील. वाऱ्याची दिशा कोकणात प्रामुख्याने ईशान्येकडून, उत्तर महाराष्ट्रात वायव्येकडून, मराठवाड्यात आग्नेय व वायव्येकडून, विदर्भात वायव्येकडून, तसेच पश्चिम महाराष्ट्रात वायव्येकडून राहील. याचा देखील थंडीच्या प्रमाणावर परिणाम होईल. किमान तापमानात हळूवारपणे घसरण होईल. त्यामुळेही थंडीचे प्रमाण सौम्य राहील. उत्तर महाराष्ट्रात दुपारी हवामान कोरडे राहील. हवामानातील बदलामुळेही थंडीचे प्रमाणावर परिणाम होईल.

कोकण

आज आणि उद्या (ता. ८,९) सिंधुदुर्ग जिल्ह्यात २.७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. मात्र रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहण्यामुळे पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशाही ईशान्येकडून राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहून वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान पालघर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. हवामान कोरडे राहील.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, नंदुरबार जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस तर धुळे व जळगाव जिल्ह्यात ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १९ टक्के इतकी कमी राहण्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा जळगाव जिल्ह्यात ईशान्येकडून, तर उर्वरित जिल्ह्यात वायव्येकडून राहील.

मराठवाडा

आज आणि उद्या (ता. ८,९) धाराशिव जिल्ह्यात २ मि.मी., लातूर जिल्ह्यात ३ ते ५ मि.मी., नांदेड जिल्ह्यात १ ते २ मि.मी., बीड जिल्ह्यात १ मि.मी., परभणी जिल्ह्यात २ मि.मी. आणि हिंगोली जिल्ह्यात १ मि.मी. प्रतिदिन पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अत्यंत हलक्या स्वरूपात काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर बीड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग बीड व परभणी जिल्ह्यात ताशी ५ ते ६ कि.मी., हिंगोली जिल्ह्यात ताशी ७ कि.मी., जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यांत ताशी ८ कि.मी. व लातूर जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील.

कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर बीड, जालना जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. तर हिंगोली, धाराशिव व लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि नांदेड व परभणी जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, बीड व जालना जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, परभणी जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत ८० ते ८५ टक्के, तर बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६५ टक्के व छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात ३४ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील.

पश्चिम विदर्भ

आज (ता. ८) वाशीम जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा बुलढाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, अकोला जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर उर्वरित जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ४६ टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज आणि उद्या (ता. ८,९) यवतमाळ जिल्ह्यात १ मि.मी., वर्धा व नागपूर जिल्ह्यात १ ते २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ७० टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ५६ ते ६१ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ४६ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज आणि उद्या (ता. ८,९) भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत प्रतिदिन ३ मि.मी., तर चंद्रपूर जिल्ह्यात २ ते ५ मि.मी. व गडचिरोली जिल्ह्यात २ ते ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर जिल्ह्यात पूर्वेकडून, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ताशी ७ कि.मी. राहील. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी १० कि.मी. राहील.

कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ७६ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता. ८,९) कोल्हापूर जिल्ह्यात १ ते ६ मि.मी. सांगली जिल्ह्यात ३ मि.मी. सातारा जिल्ह्यात १ ते २ मि.मी. व सोलापूर जिल्ह्यात १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर जिल्ह्यात ताशी ३ कि.मी., सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात ताशी ५ कि.मी. आणि पुणे जिल्ह्यात ६ कि.मी. व अहिल्यानगर जिल्ह्यात ८ कि.मी. राहील.

कमाल तापमान अहिल्यानगर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, पुणे व सातारा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, अहिल्यानगर व सातारा जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८१ टक्के, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ६५ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ५३ टक्के, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ४२ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के राहील.

कृषी सल्ला

गव्हाचे पिकास वाढीचे अवस्थेनुसार प्रत्येकी २१ दिवसांनी पाणी द्यावे.

हरभरा पीक फुलोऱ्यात असताना व घाटे भरण्याचे अवस्थेत पाणी द्यावे.

कापसाची वेचणी सकाळी करावी

कलिंगड लागवडीसाठी जमीन मशागतीची कामे करण्यास सुरुवात करावीत.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

SCROLL FOR NEXT