Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon Rain Forecast: जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांना दिलासा?

IMD July Rain Update: हवामान विभागानुसार जुलै २०२५ मध्ये महाराष्ट्रासह देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

Dhananjay Sanap

Pune News: देशात जुलै महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. जून महिन्यात चांगल्या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पेरणीला गती मिळाली. परंतु काही भागात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. आता मात्र जुलै महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांना पाऊस दिलासा देण्याची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महोपात्रा यांनी सोमवारी (ता.३०) पत्रकार परिषद घेऊन जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. 

१९७१ ते २०२० च्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात संपूर्ण देशात दीर्घकालीन सरासरीच्या २८०.४ मिमी पाऊस पडतो. यंदा जुलै महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक आहे. तर ईशान्य भारतातील राज्ये, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि वायव्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

हवामान विभागानं जुलै महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यासह मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक असल्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे राज्यात जुलै महिन्यात सर्वदूर पावसाची शक्यता अधिक आहे.

हवामान विभागानं संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्तीसगड, ओरिसाच्या बहुतांश भागासह मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तराचल काही भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, नागालॅंड, मणीपुर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालाय, बिहार, तमिळनाडू, केरळ, गुजरातच्या उत्तर भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

तापमान कमी

देशात जुलै महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहिल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. लडाख, बिहार, पूर्वोत्तर राज्ये आणि दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मध्य भारत, उत्तर भारत वगळता देशभरात किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता अधिक आहे. 

जून महिन्यात असमान पाऊस

देशात मॉन्सून हंगामात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या १०८ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा मे महिन्यात उचचांकी पावसाची नोंद झाली. जून महिन्यातही राज्यात पावसानं सरासरी गाठली. मात्र पावसाचं वितरण असमान असल्याचं दिसून आलं. जुलै महिन्यात मात्र राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्वच भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT