Heat Wave Agrowon
हवामान

Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा कहर! तापमानाचा पारा चढला

Summer Heat Update: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत असून, सोलापूर आणि रत्नागिरीत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. कोकणात दमट आणि उष्ण हवामानामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News : सूर्य तळपायला लागल्याने राज्यात उन्हाचा ताप वाढू लागला आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर आणि रत्नागिरी येथे ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथे राज्याचे नीचांकी ८ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. ८) राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत रत्नागिरी आणि सोलापूर पाठोपाठ जेऊर, सांगली, सातारा आणि वाशीम येथे कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे होते. पुणे, कोल्हापूर, धाराशिव, परभणी, अकोला येथे तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पार होता. कमाल तापमानातील वाढ होत असल्याने दुपारच्या वेळी झळा वाढल्या असून, उकाड्यातील वाढ कायम आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट झाली. किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात शुक्रवारी (ता. ७) ८ अंशांची तर परभणी येथील कृषी विद्यापीठात ९.५ अंश आणि जळगाव येथे किमान तापमान ९.८ अंशांवर होते. धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि अहिल्यानगर येथे तापमान ११ अंशांच्या खाली होते. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात तब्बल २० ते २८ अंशांपर्यंत तफावत होती.

आज (ता. ८) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत हवामान सरासरीपेक्षा उष्ण व दमट राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात उन्हाचा चटका हळूहळू वाढत जाणार आहे.

शुक्रवारी (ता. ७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३६.७---१३.२

अहिल्यानगर---निरंक---१०.५

धुळे---३४.०---१०.२

जळगाव---३४.३---९.८

जेऊर---३७.५---११.५

कोल्हापूर---३६.२---१९.७

महाबळेश्‍वर---३२.७---१८.०

मालेगाव---३४.०---१४.०

नाशिक---३६.०---१२.४

निफाड---३४.९---८.०

सांगली---३७.४---१७.०

सातारा---३७.०---१५.०

सोलापूर---३८.०---१६.८

सांताक्रूझ---३५.५---१८.२

डहाणू---३१.६---२२.०

रत्नागिरी---३८.०---१९.२

छत्रपती संभाजीनगर---३४.४---१२.४

धाराशिव---३६.१---१८.०

परभणी---३६.३---१४.०

परभणी (कृषी)---३३.७---९.५

अकोला---३६.५---१४.६

अमरावती---३५.२---१४.३

भंडारा---३२.४---१५.०

बुलडाणा---३३.८---१७.६

ब्रह्मपुरी---३५.३---१३.८

चंद्रपूर---३५.४---निरंक

गडचिरोली---३४.२---१६.०

गोंदिया---३१.४---१२.४

नागपूर---३४.२---१३.९

वर्धा---३५.५---१५.२

वाशीम---३७.४---निरंक

यवतमाळ---३४.४---१४.०

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१२.४---३७.४

मराठवाडा---९.५---३६.३

पश्‍चिम महाराष्ट्र---११.५---३८.०

उत्तर महाराष्ट्र---८.०---३६.०

कोकण---१८.२---३८.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

Paddy Sowing: भात पेरणीची घाई करू नका

Palghar Rain Update: पावसाच्या प्रतीक्षेला अखेर विराम

Tur MSP Procurement: शेतकऱ्यांकडून तुरीची हमीभावापेक्षा कमी दरात खुल्या बाजारात विक्री?; पणनमंत्र्यांकडून महत्त्वाचा खुलासा

SCROLL FOR NEXT