Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather: सोलापुरात तापमान ३८ अंशावर; राज्यात सकाळी गारवा कमी झाला; दुपारी उन्हाचा चटका वाढला

Maharashtra Heatwave Alert: राज्यात थंडीचा प्रभाव कमी होत असून तापमानाचा पारा चढू लागला आहे. सोलापूर येथे तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले असून राज्यभर उन्हाचा चटका जाणवत आहे.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील सकाळी हवेत वाढलेला गारवा कमी होत आहे. किमान तापमानात वाढ झाली आहे. तर कमाल तापमानाचा पारा ३८ अंशाच्याही पुढे गेला. आत सोलापूर येथे सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस तापमान होते. निफाड येथे सर्वात कमी १० अंशाची नोंद झाली. राज्यातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राजस्थान आणि परिसरावरील चक्राकार वाऱ्याची स्थिती निवळली आहे. तर उत्तर भारतातही तापमानात वाढ दिसून आली. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे.

आज हरियानाच्या नहान येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. देशातील निचांकी तापमानातही वाढ होत आहे. हळूहळू कमी कमी तापमान १० अंशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 

राज्यातही सकाळी हवेतील गारवा कमी झाला आहे. राज्यात किमान तापमानात पुन्हा घट झाली. तर कमाल तापमानातही वाढ सुरु झाली. दुपारी उन्हाचा चटकाह असह्य होत आहे. आज सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर काही ठिकाणी तापमान ३६ अंशाच्याही पुढे गेले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT