Maharashtra Weather No. 1 Marathi news website in India esakal.com
हवामान

Heatwave in Maharashtra: महाराष्ट्र तापला! उष्णतेची लाट कायम

Temperature Fluctuation: कोकणात तापमानाचा पारा ३८ अंशांपार असल्याने उष्णतेची लाट कायम होती. गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ३८.५ अंश तापमान नोंदले गेले.

अमोल कुटे

Pune News : कोकणात तापमानाचा पारा ३८ अंशांपार असल्याने उष्णतेची लाट कायम होती. गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ३८.५ अंश तापमान नोंदले गेले. आजपासून (ता. २८) राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २७) केरळातील कन्नूर येथे देशातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील सांताक्रूझ येथे ३८.५, डहाणू ३८.२ अंश तापमान असल्याने उष्णतेची लाट होती. किनारपट्टीय भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांची वाढ झाली किंवा तापमान ३७.५ अंशांच्या पुढे गेले तर उष्णतेची लाट आली असे समजले जाते.

रत्नागिरी, ब्रह्मपुरी, सोलापूर, यवतमाळ, अकोला येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. उकाड्याने घामाच्या धारा वाढल्या आहेत. राज्याच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. आज (ता. २८) कोकणातील ठाणे जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३४.६---१६.०

अहिल्यानगर---निरंक---१४.३

धुळे---३५.०---१२.०

जळगाव---३५.२---१७.९

जेऊर---३५.५---१६.५

कोल्हापूर---३३.७---२१.१

महाबळेश्वर---२९.१---१७.६

मालेगाव---३३.४---१६.६

नाशिक---३४.३---१५.८

निफाड---३१.२---१२.९

सांगली---३५.८---२२.५

सातारा---३४.९---१८.२

सोलापूर---३६.९---२२.२

सांताक्रूझ---३८.५---२१.६

डहाणू---३८.२---२०.५

रत्नागिरी---३७.२---२३.१

छत्रपती संभाजीनगर---३२.८---१७.६

धाराशिव---३४.५---१८.०

परभणी---३४.५---१६.७

परभणी (कृषी)---३३.६---१३.४

अकोला---३६.२---१८.०

अमरावती---३४.८---१८.७

भंडारा---३३.६---१८.६

बुलडाणा---३५.०---२०.०

ब्रह्मपुरी---३७.२---१५.६

चंद्रपूर---३५.६---निरंक

गडचिरोली---३५.०---१६.४

गोंदिया---३३.५---१४.५

नागपूर---३५.०---१६.४

वर्धा---३५.०---१७.२

वाशीम---३४.२---निरंक

यवतमाळ---३६.४---१६.२

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---१६.०---३६.९

मराठवाडा---१३.४---३४.५

पश्‍चिम महाराष्ट्र---१५.४---३६

उत्तर महाराष्ट्र---१२.०---३५.२

कोकण---२०.५---३८.५

३६ अंशापेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

सांताक्रूझ ३८.५, डहाणू ३८.२, रत्नागिरी ३७.२, ब्रह्मपूरी ३७.२, सोलापूर ३६.९, यवतमाळ ३६.४, अकोला ३६.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT