Rain Gauge Maharashtra agrowon
हवामान

Maharashtra Rain: पुढचे ५ दिवस पाऊस, उष्णतेचे; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Rain Update : राज्यात सध्या काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात पावसाची हजेरी असे चित्र दिसत आहे.

अनिल जाधव

Pune News : राज्यात सध्या काही भागात उष्णतेची लाट आणि काही भागात पावसाची हजेरी असे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोकणात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर राज्यातील इतर भागात काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला. \

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. तर संपूर्ण विदर्भात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागातही हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उद्याही सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नगर तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

कोकणातील काही ठिकाणी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सुध्दा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT