rain alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यभरात पावसाचा अंदाज; काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी

अनिल जाधव

IMD rainfall alert : राज्यातील काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे. राज्यातील अनेक मंडळांमध्ये पावसाची नोंद झाली. पण बहुतांशी भागात पाऊस नाही. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्या पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज दिला.

आज सकाळपासून राज्याच्या काही भागात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. पण सर्वदूर जोरदार पाऊस नाही. यामुळे शेतकऱ्यांना चिंता कायम आहे. आज संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण खानदेश, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक आणि नगर तर सिंधुदुर्ग वगळता कोकणात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. या भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

तर उद्या विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच संपूर्ण कोकणपट्ट्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

याशिवाय राज्याच्या इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT