Rainy Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast : उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता

Rainfall Prediction : उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात अनेक ठिकाणी पारा १० अंशांखाली घसरल्याने थंडी परतली आहे. मात्र पावसाला पोषक हवामान होत असल्याने किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. आज (ता. ११) उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच वायव्य भारतात पश्‍चिमेकडून जोरदार वारे वाहत असल्याने राज्यांमध्ये थंडीची तीव्र झाली आहे. अनेक राज्यात दाट धुक्याचे साम्राज्य दिसून येत आहे.

राज्यात थंडी कायम असल्याने शुक्रवारी (ता. १०) धुळे येथे ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील निफाड, जळगाव, अहिल्यानगर, मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ, बीड तसेच विदर्भातील नागपूर, गोंदिया, ब्रह्मपुरी येथे किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत सांताक्रूझ येथे ३४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. ११) राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ होण्याचा अंदाज असून, गारठा कायम राहण्याचा शक्यता आहे. तसेच उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान होत असून, हलक्या सरींची शक्यता हवामान वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---२८.३---१०.७

अहिल्यानगर---२८.२---९.५

धुळे---२८.०---६

जळगाव---२७.६---९.२

जेऊर---३०---११

कोल्हापूर---२७.८---१६.५

महाबळेश्‍वर---२५.६---१२.४

मालेगाव---२५.०---११.६

नाशिक---२७.२---१२.८

निफाड---२६---७.८

सांगली---२८.४---१६.९

सातारा---२९.२---१३

सोलापूर---३०.४---१७.५

सांताक्रूझ---३४.१---१६.८

डहाणू---३३.२---१७.१

रत्नागिरी---३३---२०

छत्रपती संभाजीनगर---२८.२---१२

बीड---२८.४---९.६

धाराशिव---२९.५---१२.७

नांदेड---निरंक---११

परभणी---२८---११.४

परभणी (कृषी)---२७.२---७

अकोला---२९.१---११.६

अमरावती---२८---१०.१

भंडारा---२७.२---११.७

बुलडाणा---२८.५---१३.४

ब्रह्मपुरी---३१.२---१०

चंद्रपूर---२७.८---निरंक

गडचिरोली---२७.६---११

गोंदिया---२७.२---९.९

नागपूर---२८.१---९

वर्धा---२७.५---१०.५

वाशीम---२८.४---१५

यवतमाळ---२८---१३.२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT