Rain Update Agrowon
हवामान

Ratnagiri Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात हलका पाऊस

फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून उष्मा वाढला आहे. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा ३९ अंशांवर पोहोचला. त्याचे परिणाम संवेदनशील हापूसवर होत आहेत.

Team Agrowon

Ratnagiri Rain News : हवामान विभागाकडून जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी (ता. १५) रात्री हलका पाऊस झाला. पावसाला जोर नसल्यामुळे आंबा बागायतदारांनी निःश्‍वास सोडला.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून उष्मा वाढला आहे. त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा ३९ अंशांवर पोहोचला. त्याचे परिणाम संवेदनशील हापूसवर होत आहेत.

वाढलेल्या उष्म्या‍मुळे पाऊस पडणार असा अंदाज वर्तविण्यात आला होता. बुधवारी (ता. १५) सायंकाळी ढगाळ वातावरण होते. रात्री साडेदहाच्या सुमारास पावसाला सुरवात झाली.

मात्र जोर नव्हता. पंधरा मिनिटांनी पुन्हा आकाश निरभ्र झाले. पाऊस मोठा नसल्याने त्यांनी निःश्‍वास सोडला. गुरुवारी (ता. १६) दिवसभर हलका वारा होता. सकाळी गारवा होता. हलक्या पावसाचा आंब्यावर परिणाम होणार नाही, असे बागायतदार प्रसन्न पेठे यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यात पावसाची हजेरी

सांगली जिल्‍ह्यात बुधवारी (ता. १५) रात्री आणि गुरुवारी (ता. १६) पहाटे चारच्या सुमारास अनेक भागांत ढगांच्या गडगडाटांसह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने द्राक्षे, गहू पिकांचे नुकसान होणार आहे. पावसाने द्राक्षबागायतदार शेतकरी हबकला आहे.

जिल्ह्यातील पलूस तालुक्यात बुधवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण होते. रात्री पावसाच्या सरी सुरू झाल्या. पाऊस हलक्या प्रमाणात सुरू होता.

या पावसामुळे द्राक्षे व काढणीस आलेल्या गहू पिकांचे नुकसान होणार आहे. पलूस तालुक्यातील सावंतपूर, विठ्ठलवाडी, आमणापूर व तालुक्यातील इतर भागात पावसाने हजेरी लावली. वाळवा तालुक्यात रात्री हलका पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

Maharashtra Drought Crisis: वगळलेल्या तालुक्यांचा दुसऱ्या यादीत समावेश; मुख्यमंत्री फडणवीस

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

SCROLL FOR NEXT