राज्यात थंडी वाढली 
हवामान

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार? पुढील पाच दिवस पाऊस पडेल का?

Rain Update : राज्यातील तापमानात घट झाली आहे. त्यामुळे पहाटे थंडीची चाहूल लागली आहे.

Dhananjay Sanap

IMD Alert : राज्यातील तापमानात घट झाली आहे. त्यामुळे पहाटे थंडीची चाहूल लागली आहे. परंतु राज्यातील बहुतांश भागात दुपारी ऑक्टोबर हीटचा चटका अजूनही जाणवतोय. राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाक्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. खरीपातील काढणीच्या कामांना गती आली आहे. तर काढणी झालेल्या ठिकाणी शेतकरी रब्बी पेरणीची लगबग करत आहेत. जमिनीतील ओल पाहून शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीचं नियोजन करावं, असं जाणकारांनी आवाहन केलं आहे. 

राज्यातील विविध भागात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. तसेच राज्यात पुढील पाच दिवस मुख्यत: कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. मागील २४ तासात देशात राजकोट येथे कमाल ३९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर राज्यातील जळगाव येथे तापमानाचा पारा १३.२ अंश सेल्सियसपर्यंत घसरला. तापमानात अजून घट होईल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. 

काल बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हूमन चक्रीवादळ आज दुपारी बांगलादेशमधील चित्तगाव दक्षिण किनारपट्टीला जाऊन निवळले आहे. त्याचं रुपांतर कमी दाब क्षेत्रात झाल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही. तसेच थंडीचा कडाका वाढण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य

El Nino Impact Agriculture: यंदा एल निनोचे सावट; भूजल पुर्भरण गरजेचे!

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

SCROLL FOR NEXT