Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा अंदाज आहे का? पुढील आठवडाभर राज्यातील हवामान कसे राहील?

Weather Update : आजपासून पुढील आठवड्यातील म्हणजे १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे. महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १४ अंश तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० अंश म्हणजे सरासरी इतके राहू शकते.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील थंडी सध्या कायम दिसते. त्यामुळे पुढील एक किंवा दोन आठवडे वातावरण कसे राहील? याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे.

पुढील आठवड्यात हवामान कसे राहील? पावसाचा अंदाज आहे का? फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील हवामान कसे राहू शकते? याविषयी हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सविस्तर माहिती दिली. 

पुढील आठवडाभर हवामान कसे राहू शकते? याविषयी बोलताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकरा खुळे म्हणाले की, आजपासून पुढील आठवड्यातील म्हणजे १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे.

सध्या नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पहाटेचे किमान तापमान १२ अंश तर दुपारचे कमाल तापमान २६ अंशाच्या दरम्यान राहू शकते असु शकते, असे वाटते.

त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पहाटेची थंडी त्यामानाने जरी कमी वाटत असली तरी दिवसाचा ऊबदारपणा कमी जाणवण्याची शक्यताही अधिक आहे. त्यामुळे हिवाळ्याला साजेशी अश्या थंडीचा अनुभव येवू शकतो. जळगांव जिल्ह्यात तर पहाटेचे किमान तापमान १० अंशापर्यंतही घसरू शकते.

मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १४ अंश तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० अंश म्हणजे सरासरी इतके राहू शकते. ह्या आठवड्यादरम्यान महाराष्ट्रात थंडीच्या लाटीची शक्यता मात्र जाणवणार नाही, असे वाटते. 

महाराष्ट्रातील थंडी सध्या कश्यामुळे टिकून आहे ? यावर बोलताना खुळे म्हणाले की, सध्या उत्तर भारतात विविध कारणांनी थंडी कमी जाणवत आहे. तरी उत्तर भारतात समुद्रसपाटीपासून दहा ते बारा किलोमीटर उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २८० किलोमीटर वेगवान प्रवाही झोताचे 'पश्चिमी' वारे पूर्वेकडे अजूनही वाहत आहे.

ह्या पश्चिमी झोताच्या परिणामातून थंडी विनाअडथळा महाराष्ट्राकडे वाहत येत आहे. म्हणून कमी तीव्रतेची का थंडी होईना पण ती जास्त दिवसाच्या वहनामुळे महाराष्ट्राला थंडीचा फायदा  होत आहे.

सध्याची थंडी शेतपिकांना पोषक आहे का ? या प्रश्नावर बोलताना श्री. खुळे म्हणाले की,          सध्या जानेवारीतील थंडी जरी कमी भासत आहे. तरी चालू ' एल-निनो व कमी पर्जन्यमान वर्षाच्या रब्बी हंगामातील शेतपिकांना मात्र ह्या ' जिवंत ' सातत्यपूर्ण थंडीतून , मावा, बुरशी, कीडी पासूनचा होणारा आघात व तण ह्यांपासून काहीशी सुटका तर मिळालीच व ती सुरक्षितही राहिली.

भाजीपाला, भरडधान्ये शेतपिके, फळबागा उस व आल्यासारखी दिर्घकालावधीच्या पिकांना वातावरणीय अवस्था ही एक जमेची बाजूच समजावी.

महाराष्ट्रात पुढील आठवड्यासाठी पावसाचा काय अंदाज असू शकतो? याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की, सध्या आयओडी तटस्थेत तर एमजेओ देशाच्या महासागरीय क्षेत्राच्या बाहेर पडली आहे. पावसासाठीची पूरकतता त्यामुळे ह्या आठवड्यात वजाबाकीत म्हणजे कमी झाली आहे. विदर्भ वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात  पुढील आठवड्यात म्हणजे गुरुवार १ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यताही जाणवत नाही.

मात्र विदर्भ व नांदेड मध्ये २ दिवस म्हणजे २४ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे २ दिवसाच्या कालावधीतील तेथील थंडी कदाचित घालवली जाईल. परंतु गुरुवार २५ जानेवारी पासून पुन्हा सध्या पडत असलेल्या थंडीसारखी थंडी पूर्ववत होण्याची अपेक्षा करू या! 

फेब्रुवारी व मार्च ह्या दोन महिन्यात राज्यातील हवामान कसे राहील? याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की, फेब्रुवारी आणि मार्च महिने ही गारपीट हंगामाचे असतात. तसेच वातावरणात त्या दरम्यान घडणाऱ्या 'वारा खंडितता ' प्रणालीतून पडणाऱ्या पावसाचे असतात. खरं तर येणाऱ्या दोन महिन्यातील ह्या घटना त्या वेळी वातावरणीय काय प्रणाल्या असतील त्यानुसार त्या वेळीच दहा दिवस, पंधरवडा अश्या लघुपल्ल्याच्या तसेच प्रत्येक महिन्याच्या मिळणाऱ्या अंदाजातूनच ह्याबाबत बोलणे योग्य होईल, असे वाटते.

सध्या अजूनही अधिक तीव्रतेतील ' एल- निनो ' ह्या घटनांना मारकही ठरू शकतो. म्हणूनच त्या घटना घडतीलच असा लगेचच अर्थ आजच काढू नये. फक्त हंगामी घडणाऱ्या वातावरणीय घटनांच्या कालावधीची आठवण असावी म्हणून उल्लेख केला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT