Monsoon  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर पुन्हा वाढणार

अमोल कुटे

Pune News : पावसाला पोषक हवामान होत असल्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पुन्हा जोर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ५) दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट ) आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा, तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

गुरूवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. कोल्हापूरातील चंदगड येथे सर्वाधिक १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आजरा आणि गगणबावडा येथेही ९० मिलीमीटर पाऊस झाला. राज्याच्या अनेक भागात पावसाची उघडीप असल्याचे दिसून आले.

उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीत आला आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेरपासून ओराई, चुर्क, पुरूलिया ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

यातच राजस्थानपासून पासून बांग्लादेशपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. गुजरात ते कर्नाटक किनाऱ्यापर्यंत लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा असल्याने पावसाचा पोषक हवामान होत आहे.

आज (ता. ५) कोकणातील सिंधुदुर्ग, सातारा आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण आणि नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.

गुरूवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण :

मंडणगड ७०, दोडामार्ग, कुडाळ प्रत्येकी ५०, आवळेगाव, मुलदे, सावंतवाडी, वैभववाडी प्रत्येकी ४०, सुधागड पाली, लांजा, राजापूर, संगमेश्वर प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र :

चंदगड १४०, गगणबावडा, आजरा प्रत्येकी ९०, राधानगरी, महाबळेश्वर, शाहूवाडी प्रत्येकी ४०, पाटण, वेल्हे प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

औसा ३०, धाराशिव प्रत्येकी ३०.

विदर्भ : साकोली ४०, नरखेड, बाभूळगाव, नेर, दिग्रस, नागपूर, गोंडपिंपरी, यवतमाळ, दारव्हा, अहेरी प्रत्येकी ३०.

घाटमाथा :

कोयना नवजा १००, दावडी, शिरगाव प्रत्येकी ५०, ताम्हणी, कोयना पोफळी प्रत्येकी ४०.

जोरदार पावसाचा इशारा ( ऑरेंज अलर्ट) :

सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Management : सिंचन व्यवस्थापन बदलत्या वातावरणाशी सुसंगत हवे

Cotton Disease : कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली

E-Peek Pahani : ई-पीकपाहणीची अट रद्द करा

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

SCROLL FOR NEXT