Rain Update Agrowon
हवामान

Monsoon Rain : जुलैमध्ये राज्यात चांगल्या पावसाचे संकेत

Rain Update : जून महिन्यात पावसाच्या असमान वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News : जून महिन्यात पावसाच्या असमान वितरणानंतर जुलैमध्ये शेतकऱ्यांसाठी आशादायी चित्र राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत असून, देशात १०६ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत असले तरी कमाल आणि किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे.

जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज सोमवारी (ता. १) हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला. डॉ. महापात्रा म्हणाले, की जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात देशात सरासरी १६५.३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जून अखेर सरासरी १४७.२ मिलिमीटर म्हणजेच ८९ टक्के पाऊस झाला आहे.

जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारत, वायव्य आणि पूर्व भारताचा काही भाग आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. १९७१ ते २०२० या कालावधीतील नोंदीनुसार जूलै महिन्यात देशात २८०.४ मिलिमीटर पाऊस पडतो.

जुलै महिन्यात महाराष्ट्रासह मध्य भारत, पूर्वोत्तर राज्ये, पूर्व भारत आणि पश्चिम किनारपट्टीलगत कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर उत्तरेकडील राज्यांचा काही भाग वगळता देशभरात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहणार आहे.

ला-निना होतोय विकसित

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सध्या सर्वसाधारण (एन्सो न्यूट्रल) स्थिती असून, मॉन्सूनच्या हंगामाच्या मध्यावर ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहे. मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात तीव्र होत जाणार आहे. हिंद महासागरात सर्वसाधारण इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती असून, उर्वरित मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

जुलै महिन्यात यंदा राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी पावसाचे वितरण असमान असल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यातील सर्वदूर चांगल्या पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे. खानदेश आणि मराठवाड्याच्या उत्तर भागात सरासरी इतका तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT