Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : किमान तापमानातील वाढीने थंडी कमी

Winter Update : नव वर्षाच्या प्रारंभी राज्याच्या किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडी कमी झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : नव वर्षाच्या प्रारंभी राज्याच्या किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे थंडी कमी झाली आहे. आज (ता. २) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहणार आहे. पूर्व विदर्भात मात्र किमान पारा काहीसा घसरण्याची शक्यता आहे. गुरूवारपासून (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतातील राज्यात थंडी वाढली असून, सोमवारी (ता. १) राजस्थान मधील फालोदी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये अनेक भागात किमान तापमान ६ ते ९ अंशांच्या दरम्यान होते. उत्तर भारतातील अनेक राज्यात दाट धुके पहायला मिळत असून, पंजाब हरियाना, राजस्थानसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या काही भागात थंडीची लाट आली आहे.

राज्यात थंडी कमी असून, बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १४ अंशांच्या वर गेला आहे. सोमवारी (ता. १) धुळे येथील कृषी महाविद्यालयात आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहणार असून, पूर्व विदर्भात पारा घसरण्याची शक्यता आहे. गुरूवारपासून (ता.४) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. ५) सिंधुदूर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.५ (१३.१), धुळे ३१.० (११.६), जळगाव ३०.४ (१४.२), कोल्हापूर ३०.६ (१६.५), महाबळेश्वर २८.६ (१४.९), नाशिक ३१.४ (१६.४), निफाड ३०.० (११.६), सांगली ३०.७ (१५.९), सातारा ३१.७ (१३.७), सोलापूर ३३.२(१७.६), सांताक्रूझ ३४.० (२०.४), डहाणू ३०.१ (१९.७), रत्नागिरी ३५.६ (१९.९),

छत्रपती संभाजीनगर २९.४ (१५.२), नांदेड - (१६.८), परभणी २९.४ (१४.९), अकोला ३१.२ (१७.४), अमरावती ३०.० (१४.५), बुलढाणा ३०.४ (१६.५), ब्रह्मपूरी ३०.६ (१४.६), चंद्रपूर २८.८ (१३.२), गडचिरोली २९.६ (१४.२), गोंदिया २७.८ (१२.४), नागपूर २८.७(१४.६), वर्धा २८.८(१४.५), वाशीम ३०.६ (१४.२), यवतमाळ ३०.५ (१४.५).

कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकतेय

विषूववृत्तीय हिंद महासागर आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. ही प्रणाली आज (ता. ३)आणखी तीव्र होणार आहे. ठळक कमी दाब क्षेत्रात रुपांतरण झाल्यानंतर ही प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT