Summer Heat Agrowon
हवामान

Weather Update : उन्हाचा चटका अन् उकाडा वाढला

Summer Heat : राज्यातील गारठा कमी होण्याबरोबरच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील गारठा कमी होण्याबरोबरच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज (ता. ६) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. सोमवारी (ता. ५) पंजाबमधील अमृतसर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित देशात किमान तापमानात वाढ झाली आहे. उत्तराखंड हिमवृष्टी होण्याची, तर पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान, झारखंड राज्यांत दाट धुके पडण्याची शक्यता आहे.

राज्याच्या तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा १२ अंशाच्या पुढे गेला आहे. किमान तापमान १२ ते २१ अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ अंशांची वाढ झाली आहे.

सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून, अनेक ठिकाणी पारा ३२ अंशांच्या वर आहे. आज (ता. ६) किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.५ (१६.२), धुळे ३४.५ (१२.८), जळगाव ३३.० (१५.०), कोल्हापूर ३२.७ (२०.७), महाबळेश्वर २७.६ (१६.८), मालेगाव ३४.४ (१७.२), नाशिक ३३.५ (१६.२), निफाड ३१.५ (१२.१), सांगली ३३.४ (२०.१), सातारा ३२.८ (१८.५), सोलापूर ३५.४(२०.८), सांताक्रूझ ३५.७ (२०.३), डहाणू ३०.९ (१९.०), रत्नागिरी ३४.२ (२१.७),

छत्रपती संभाजीनगर ३२.४ (१७.७), नांदेड ३२.२ (१९.८), परभणी ३२.८ (१८.२), अकोला ३४.३ (१७.६), अमरावती ३२.० (१६.९), बुलढाणा ३३.० (१८.२), ब्रह्मपूरी ३४.४ (१७.०), चंद्रपूर ३२.२ (१४.६), गडचिरोली ३१.६ (१६.०), गोंदिया ३१.४ (१५.८), नागपूर ३२.२(१५.८), वर्धा ३२.८(१७.०), वाशीम ३२.२ (१७.८), यवतमाळ ३४.० (२०.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT