Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ; मात्र थंडी कायम राहणार

Maharashtra Weather Forecast : राज्यातही गारठा कायम असून, शुक्रवारी (ता. १३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात नीचांकी ६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने यंदाच्या हंगामात सपाट भूभागावर प्रथमच शून्य अंशाच्या खाली घसरला आहे. राज्यातही गारठा कायम असून, शुक्रवारी (ता. १३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यात नीचांकी ६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

लक्षद्वीप आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रात आज (ता. १४) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होणार असून, सोमवारपर्यंत (ता. १६) या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. यातच पश्‍चिमी चक्रावात आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे. शनिवारी (ता. ११) पंजाबच्या ‘अदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी उणे ०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात गारठा कायम असला, तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३३.८ अंश तापमानाची नोंद झाली. दिवसभर वाऱ्यांमुळे थंडी जाणवत असून, सूर्यास्तानंतर हवेतील गारठा अधिक वाढत आहे. धुळ्यासह परभणी (कृषी), जळगाव, गडचिरोली येथे तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. राज्यात गारठा कायम राहणार असला, तरी दोन दिवसांत किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.३ (१२.६), अहिल्यानगर २८.२ (१२.४), धुळे २९.५ (६), जळगाव ३१.५ (८.९), जेऊर ३१.५ (११), कोल्हापूर २९.६ (१७.६), महाबळेश्‍वर २५.६ (११.६), मालेगाव २७ (१२.८), नाशिक २९.६ (११.९), निफाड २७.१ (११), सांगली ३१.२ (१७.२),

सातारा ३०.२ (१६), सोलापूर ३२.१ (१६.२), सांताक्रूझ ३२.८ (१९.३), डहाणू २८.३ (१६.६), रत्नागिरी ३३.८ (२०.७), छत्रपती संभाजीनगर ३० (१२.६), धाराशिव ३०.१ (१३.४), नांदेड - (१२.२), परभणी २९.४ (११.९), परभणी कृषी विद्यापीठ २८.२ (८.५), अकोला ३०.४ (१२.६), अमरावती ३०.२ (१३.८), भंडारा २७.४ (१३), बुलडाणा २७.४ (१२.६), ब्रह्मपुरी ३०.२ (११.७), चंद्रपूर २८ (११.४), गडचिरोली २७.८ (१०), गोंदिया २७.२ (१०.९), नागपूर २८.३ (१०.४), वर्धा २८.९ (११.६), वाशीम ३०.२ (१३.५), यवतमाळ २९.५ (-).

१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :

धुळे ६, परभणी (कृषी) ८.५, जळगाव ८.९, गडचिरोली १०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT