Weather Update Agrowon
हवामान

Weather Update : राज्यातील गारठ्या होणार वाढ; तापमानाचा पारा घसरला

Rain update : हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज दिला आहे.

Dhananjay Sanap

IMD Alert : राज्यातील तापमानात घट येऊ लागली आहे. त्यामुळे हळूहळू गारठा वाढू लागला आहे. सकाळी वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. तसेच दुपारच्या तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता नाही, असं जाहीर केलं आहे. 

मागील २४ तासात जळगाव येथे सर्वात कमी १०.९ अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरलं होतं. त्यामुळे उत्तर खानदेशात गारठा वाढला आहे. राज्यात पुढील दोन दिवसांनी थंडी वाढू लागेल, असा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. 

राज्यात विविध भागात पुढील ४ ते ५ कमला तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर १-२ अंश सेल्सिअसने तापमानाचा पार घसरण्याची शक्यता आहे. मात्र येत्या दोन दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता असल्याने राज्यात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, राज्यात कोरड्या हवामानामुळे खरीपातील पीक काढणीला गती आली आहे. तसेच जमिनीत ओल असलेल्या बहुतांश भागात शेतकरी रब्बी पेरणी करत आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT