Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : उन्हाचा चटका अन् उकाड्यात वाढ कायम

Summer Heat : राज्याच्या किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यातील वाढ कायम आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्याच्या किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे राज्यात गारठा कमी झाला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यातील वाढ कायम आहे. आज (ता. ७) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत असून, शुक्रवारपासून (ता. ९) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला आहे. मंगळवारी (ता. ६) हरियानातील कर्नाल यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित देशाच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.

यातच मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयात झाला आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी १० अंश तापमान नोंदले गेले असून, उर्वरित राज्यात किमान तापमान ११ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे. तर कमाल तापमानात वाढ झाल्याने सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अनेक ठिकाणी पारा ३३ अंशांच्या वर आहे. आज (ता. ६) किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३४.८ (१६), धुळे ३५ (११.५), जळगाव (१५.२), कोल्हापूर ३३.६ (२१.१), महाबळेश्‍वर २८.३ (१८.५), मालेगाव ३५.६ (१५.६), नाशिक ३२.५ (१३.६), निफाड ३१.४ (१०), सांगली ३४.४ (२०.२), सातारा ३४.१ (१८), सोलापूर ३६.३ (२१.६), सांताक्रूझ ३३.१ (१९.४), डहाणू ३०.८ (१९), रत्नागिरी ३३.५ (२१.७),

छत्रपती संभाजीनगर ३३.४ (१६.५), नांदेड (२०.६), परभणी ३४.६ (१८.५), अकोला ३५.४ (१७.६), अमरावती ३३ (१६.९), बुलडाणा ३३.४ (१७.६), ब्रह्मपुरी ३४.२ (२०.२), चंद्रपूर ३३.४ (१५.२), गडचिरोली ३२.४ (१६.६), गोंदिया ३२ (१८), नागपूर ३३.८ (१७), वर्धा ३४.१ (१७.९), वाशीम ३४ (१६.६), यवतमाळ ३४.५ (१७.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

Farm Protection : वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतांना तार कुंपण द्यावे : बारड

Sericulture Technology : रेशीम उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

SCROLL FOR NEXT