Monsoon Agrowon
हवामान

Return Monsoon : परतीचा माॅन्सून कुठवर पोचला? राज्यात पुढील पाच दिवस कसे हवामान राहील?

Monsoon Rain : . देशात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. पण राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे.

Anil Jadhao 

Rain Alert : माॅन्सूनचा परतीचा प्रवास गेल्या दोन दिवसांपासून थांबला आहे. माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नसल्याने वाटचाल थबकली आहे. देशात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. पण राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे.

माॅन्सूनचा परतीचा प्रवास मागील दोन दिवसांपासून थबकला आहे. सोमवारी माॅन्सूनने देशातील काही भागांमधून काढता पाय घेतला होता. माॅन्सून सोमवारी पूर्व उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशच्या सर्व भागातून माॅन्सून परतला होता. तर बिहारचा आणखी काही भाग, झारखंड, छत्तसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी भागातून माॅन्सूनने माघार घेतली होती. तर महाराष्ट्राच्या बहुतांशी भागातून माॅन्सून परतला.

माॅन्सून कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याचा काही भाग आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात आहे. माॅन्सूनच्या परतीची सिमा दौलतगंज, कांकेर, रामागुंडम, बिजापूर आणि वेंगुर्ला या भागात कायम होती. देशातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि हिमालयाच्या शेजारच्या भागात पाऊस पडत आहे.

राज्यात मात्र उन्हाचाकडाका चांगलाच वाढला. राज्यात सकाळपासूनच उन्हाची ताप वाढत आहे. तर रात्री काही प्रमाणात गारवा जाणवतो. दुपारी उन्हाचा चटका असह्य होत आहे. राज्याच्या बहुतांशी भागात तापमानात वाढ झाली आहे. यामुळे पिकांना सिंचन करण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहेत. राज्यात पुढील पाच दिवस हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT