Maharashtra Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : डिसेंबरमध्ये थंडी कशी राहील? राज्यातील पुढील काळात हवामानात काय बदल होतील?

Weather Update : राज्यात सध्यातरी पावसाचे वातावरण नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. डिसेंबर महिन्यात थंडी कायम राहू शकते.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात मागील काही दिवसांपासू वातावरणातील गारवा काहीसा वाढला आहे. पण कडाक्याची थंडी दिसत नाही. तसेच राज्यात सध्यातरी पावसाचे वातावरण नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. डिसेंबर महिन्यात थंडी कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

राज्यातील हवामानासंदर्भात माहिती देताना हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे म्हणाले की, सध्या किमान तापमानाचा पारा खाली घसरतो आहे. पण किमान तापमान अजून डिसेंबरमध्ये असायला पाहिजे त्या पातळीवर दिसत नाही. किंवा अजुनही आलेले नाही.

म्हणून सध्या अपेक्षित थंडी अजून जाणवत नाही. सध्याची थंडीचे किमान तापमान सरासरीपेक्षा अधिकच आहे. डिसेंबरमधील थंडी ह्याच पातळीत राहील असे वाटते. सध्याचे महाराष्ट्रातील तापमान वेगवेगळ्या भागात १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने अधिक आहे. 

महाराष्ट्रातील दुपारचे कमाल तापमान सध्या २९ अंश सेल्सिअसदरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा १ अंश सेल्सिअसने कमी आहे. म्हणजे दुपारचा थंडावा अजून आहेच, असेही श्री खुळे यांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाच्या काळातील डिसेंबर हा महिना शेवटचा महिना असून सध्या भारत समुद्रीय क्षेत्रात चक्रीवादळाची कोणतीही बीजरोवणी नसून नजिकच्या काळात महाराष्ट्रावर चक्रीवादळाचा प्रभाव असणार नाही, असे दिसते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात जी काही थंडी पडत आहे ती हिरावण्याची शक्यता जाणवत नाही. रब्बी शेतपिकांसाठी ही जमेची बाजू समजावी असे वाटते, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT