Heatwave Alert Agrowon
हवामान

Heatwave Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण हवामानाचा इशारा

Maharashtra Weather: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानामुळे जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. हवामान विभागाने १८ एप्रिलसाठी येलो अलर्ट जारी केला असून, शेतकऱ्यांना विशेष दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात कमाल तापमानात वाढ होत असल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. १८) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज आहे.

वायव्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टा सक्रिय आहे. या प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होत आहे.

गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथे ४३ अंश, तर जळगाव, जेऊर, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, यवतमाळ येथे ४२ अंशांपेक्षा अधिक, पुणे, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि वाशीम येथे ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

आज (ता. १८) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाश, उष्ण व दमट हवामानाचा अंदाज कायम आहे.

गुरुवारी (ता. १७) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---४१.२---२०.२

अहिल्यानगर---४०.२---२१.५

धुळे---४३.०---२१.४

जळगाव---४२.५---२५.८

जेऊर---४२.५---२२.०

कोल्हापूर---३९.०---२३.१

महाबळेश्वर---३३.३---१९.४

मालेगाव---४१.६---२५.२

नाशिक---३९.४---२२.१

निफाड---४०.५---१९.९

सांगली---४०.५---२३.३

सातारा---४०.२---२१.६

सोलापूर---४२.२---२७.०

सांताक्रूझ---३३.८---२४.४

डहाणू---३४.६---२४.८

रत्नागिरी---३२.५---२४.४

छत्रपती संभाजीनगर---४१.४---२५.२

धाराशिव---४०.२---२४.४

परभणी---४१.५---२६.३

परभणी (कृषी)---४१.१---२३.०

अकोला---४३.४---२७.३

अमरावती---४२.२---२५.४

भंडारा---३८.०---२२.०

बुलडाणा---४०.०---२७.६

चंद्रपूर---४२.४---निरंक

गडचिरोली---३९.६---२३.०

गोंदिया---३८.२---२३.२

नागपूर---४०.२---२५.०

वर्धा---४०.६---२६.२

वाशीम---४१.०---निरंक

यवतमाळ---४२.२---२७.६

सरासरी तापमान (अंश से.)

विभाग---किमान---कमाल

विदर्भ---२२.०---४३.४

मराठवाडा---२३.०---४१.५

पश्‍चिम महाराष्ट्र---१९.४---४२.२

उत्तर महाराष्ट्र---१९.९---४३.०

कोकण---२४.४---३४.६

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली.

४२ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

अकोला ४३.४, धुळे ४३, जळगाव ४२.५, जेऊर ४२.५, चंद्रपूर ४२.४, सोलापूर ४२.२, अमरावती ४२.२, यवतमाळ ४२.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT