Monsoon Update Agrowon
हवामान

Monsoon Update : विदर्भ, कोकणात आज जोरदार पावसाची शक्यता

Rain Update : मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी व उन्हाच्या वाढलेल्या झळा यामुळे राज्यात पावसाची जोरदार प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

Pune Weather News : मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी व उन्हाच्या वाढलेल्या झळा यामुळे राज्यात पावसाची जोरदार प्रतीक्षा आहे. आजपासून (ता. २२) कोकणात पावसाला सुरुवात होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे.

पावसाला पोषक हवामान होताच, पूर्वमोसमीचे ढग गोळा होऊ लागले आहेत. बुधवारी (ता. २१)सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमान ३३ ते ४२ अंशाच्या दरम्यान आहे. राज्यात जोरदार वारे वाहत आहेत. हवामान ढगाळ होत आहे. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ६.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात उष्ण ते तीव्र उष्ण लाट आली होती.

मध्य उत्तर प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. दक्षिण पंजाबपासून बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोलीत आज (ता. २२) उष्ण लाट कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात वादळी पावसाचा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा, तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनची प्रगती नाहीच
आठवडाभरापासून थांबलेली मॉन्सूनची वाटचाल सोमवारी (ता. १९) पुन्हा सुरू झाली. कर्नाटक, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्याच्या काही भागात मॉन्सूनने आगेकूच केली. बुधवारी (ता. २१) मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. शनिवारपर्यंत (ता. २४) दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारचा आणखी काही भाग, तसेच ओडिशा आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

पूर्वोत्तर राज्यांसह दक्षिण भारतात हजेरी
आसाम, मेघालयासह पूर्वोत्तर राज्य आणि पश्चिम बंगाल मध्ये मॉन्सून दमदार कोसळत आहे. बुधवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पूर्वोत्तर राज्यात अनेक ठिकाणी १३० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. मेलाबाजार, गोईबरगांव तसेच पश्चिम बंगालमधील जलपैगुडी येथे २०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. दक्षिण भारतातील राज्यातही मॉन्सूनचा पाऊस सुरू आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात काही ठिकाणी ५० ते ७० मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३५.१ (२४.४), जळगाव ३९.२ (-), धुळे ३८.० (-), कोल्हापूर ३४.० (२३.७), महाबळेश्वर २३.३ (१८.२), नाशिक ३३.४ (२४.०), निफाड ३४.६ (२५.०), सांगली ३५.७ (२३.४), सातारा ३४.७ (२३.३), सोलापूर ३८.६ (२५.४), सांताक्रूझ ३३.९ (२८.४), डहाणू ३३.९ (२८.२), रत्नागिरी ३२.९ (२८.२), छत्रपती संभाजीनगर ३६.४ (२३.२), नांदेड ३९.० (२८.६), परभणी ३८.६ (२७.५), अकोला ४०.२ (२९.२), अमरावती ४०.४(२७.०), बुलडाणा ३७.० (२५.४), ब्रह्मपुरी ४२.१ (२८.५), चंद्रपूर ४२.२(२७.८), गडचिरोली ४१.२ (२८.४), गोंदिया ४१.४ (२८.५), नागपूर ४१.४ (२९.९), वर्धा ४१.०(२८.४), वाशीम ३९.५(२६.८) यवतमाळ ३९.७ (२७.५).

उष्ण लाटेचा इशारा :
चंद्रपूर, गडचिरोली.\

विजांसह पावसाचा इशारा :
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :
चंद्रपूर ४२.२, ब्रह्मपुरी ४२.१.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT