Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; राज्यात जोरदार पावसाची शक्यता

Monsoon Rain : मागील १८ दिवसांपासून मॉन्सूनची एका जागेवर कायम आहे. परंतु आता मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसात मॉन्सून विदर्भासह इतर भागात आगेकूच करेल, तसेच पुढील ४८ तास राज्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

Dhananjay Sanap

Weather Update: मागील १८ दिवसांपासून मॉन्सूनची एका जागेवर कायम आहे. परंतु आता मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील दोन दिवसात मॉन्सून विदर्भासह इतर भागात आगेकूच करेल, तसेच पुढील ४८ तास राज्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील विविध भागात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आजही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यात कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात एक दोन ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

तर पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गसह पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.तसेच कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूरसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनची वाटचाल २६ मेपासून थांबलेली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागापर्यंत पोहोचलेल्या मॉन्सूनची सीमा तब्बल १८ दिवसांपासून कायम आहे.

वाटचालीस पोषक हवामान होत असल्याने विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशा राज्याच्या काही भागात, तसेच सोमवारी (ता. १६) गुजरातसह पूर्व भारतातील पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्यात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT