Monsoon Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: राज्यात कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Monsoon Forecast: अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. कोकणात मुसळधार पावसासह ‘रेड अलर्ट’ जारी असून, विदर्भ-मराठवाड्यातही पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Anil Jadhao 

Pune News: अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पाऊस हजेरी लावत आहे. बहुतांश भागात शेतीच्या पूर्व मशागतीला अडसर निर्माण झाला आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यात शनिवारी (ता.२४) सर्वत्र पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यभर पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात तर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सतर्कतेचा 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

तर पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपुर आणि नागपुर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तसेच उर्वरित राज्यात सर्वच तुरळक ठिकाणी जिल्ह्यात वादळी वारे वीजांच्या कडकडटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजासह वादळी पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील चार दिवस राज्यात पावसाची हजेरी विविध भागात शक्य असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.

दोन दिवस एकाच जागेवर मुक्काम करून मॉन्सूनने शनिवारी गोव्याच्या उंबरठ्यावर मजल मारली आहे. मॉन्सून पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT