Pune News : मॉन्सूनच्या पावसाची दमदार हजेरी सुरू असल्याने कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज (ता. २८) कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने, तसेच मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, उत्तरेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे. विदर्भ आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. छत्तीसगडपासून आग्नेय राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंत मुंबईसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे उच्चांकी २८० मिलिमीटर पाऊस पडला.
आज (ता. २७) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता दक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. ठाणे, मुंबईसह पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनची प्रगती नाही
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने चाल करत सोमवारी (ता.२६) मुंबई, पुणे, सोलापूर, धाराशिवपर्यंत धाव घेतली. मंगळवारी (ता. २८) मॉन्सूनने प्रगती केली नाही. वाटचालीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटकचा उर्वरित भाग, तेलंगण, आंध्र प्रदेशच्या आणखी काही भाग, तसेच सिक्कीम, पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :
कोकण : म्हसळा २८०, मुरूड, पनवेल प्रत्येकी २५०, दापोली २४०, देवगड १८०, रामेश्वर, तळा, श्रीवर्धन प्रत्येकी १७०, अलिबाग, कुलाबा, पेण, गुहागर प्रत्येकी १६०, वाकवली, माथेरान प्रत्येकी १५०, सांताक्रुझ, माणगाव प्रत्येकी १४०, रोहा, कणकवली, मंडणगड प्रत्येकी १३०, खालापूर, रत्नागिरी, पोलादपूर, हर्णे १२०, कर्जत, सुधागड पाली, उरण, चिपळूण, मुळदे प्रत्येकी १००, राजापूर, कुडाळ, मालवण प्रत्येकी ९० महाड, डहाणू प्रत्येकी ८०, सावंतवाडी, अंबरनाथ, वैभववाडी प्रत्येकी ७०.
मध्य महाराष्ट्र : वडगाव मावळ १००, कर्जत ८०, लोणावळा, बार्शी, पौड प्रत्येकी ७०, गारगोटी, जेऊर प्रत्येकी ६०, तळगाव, दौंड, चिंचवड, जामखेड, इंदापूर प्रत्येकी ५०, कागल, गगनबावडा, वेल्हे प्रत्येकी ४०, सिन्नर, घोडेगाव, श्रीगोंदा, संगमनेर, श्रीरामपूर, चास, शिरूर, चंदगड, माळशिरस, राहुरी, बारामती, जुन्नर, सातारा प्रत्येकी ३०.
मराठवाडा : वाशी १००, लोहारा ८०, उमरगा ७०, भूम ६०, आष्टी, बीड, धाराशिव, पाटोदा प्रत्येकी ५०, लातूर, तुळजापूर, कळंब, निलंगा प्रत्येकी ३०.
विदर्भ : मौदा २०, आमगाव, सेलू, आर्वी प्रत्येकी १०.
मंगळवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
पुणे---२८.४---२१.९
अहिल्यानगर---३०.८---२२.४
धुळे---३५.०---२०.४
जळगाव---३९.०---२६.२
जेऊर---३०.०---१९.०
कोल्हापूर---२४.३---२१.८
महाबळेश्वर---२०.१---१८.१
मालेगाव---३५.२---२३.८
नाशिक---३१.३---२१.८
निफाड---३२.५---२१.८
सांगली---२४.७---२२.२
सातारा---२६.१---२२.१
सोलापूर---३०.८---२२.८
सांताक्रूझ---२८.७---२२.५
डहाणू---३३.१---२२.०
रत्नागिरी---२७.३---२३.५
छत्रपती संभाजीनगर---३४.४---२३.१
धाराशिव---२७.६---२१.२
परभणी---निरंक---२४.५
परभणी (कृषी)---३२.४---२३.७
अकोला---३६.९---२६.८
अमरावती---३५.८---२४.५
बुलडाणा---३३.५---२४.२
ब्रह्मपुरी---३८.०---२६.०
चंद्रपूर---३७.८---२५.४
गडचिरोली---३४.०---२४.०
गोंदिया---३६.४---२५.५
नागपूर---३८.१---२७.५
वर्धा---३७.०---२७.५
वाशीम---३४.८---निरंक
यवतमाळ---३०.०---२६.४
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, मुंबई, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, हिंगोली, नांदेड.
विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली.
१५० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे :
म्हसळा २८०, मुरूड २५०, पनवेल २५०, तळा १७०, श्रीवर्धन १७०, अलिबाग १६०, पेण १६०, माथेरान १५० (जि. रायगड), दापोली २४०, गुहागर १६०, वाकवली १५० (जि. रत्नागिरी), देवगड १८०, रामेश्वर १७० (जि. सिंधुदुर्ग), कुलाबा १६० (जि. मुंबई).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.