Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: विदर्भात २ दिवस मुसळधारेचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा जोर कमी होणार

Rain Alert: पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भात आणि कोकणात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: विदर्भात पावसाची जोरदार बॅटींग सुरुच आहेत. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. कोकण आणि घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भात आणि कोकणात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर इतर भागात पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

हवामान विभागाने आज विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदीया या ३ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. तर अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या ४ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. खानदेशातील ३ जिल्हे तसेच मराठवाड्यातील छत्ररती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

उद्याही विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होऊन काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

शुक्रवारी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. शनिवारी विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance GR: फळपीक विम्याच्या 'आंबिया बहार'साठी १२९ कोटी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Heavy Rainfall: जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

Public Issues: सामान्य जनतेची अडवणूक खपवून घेणार नाही: आमदार सुभाष देशमुख

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

SCROLL FOR NEXT