Pre Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोर कमी राहणार

Rain Forecast: महाराष्ट्रात १ ते ७ जूनदरम्यान हवामानात चढ-उतार राहणार आहेत. हवेचा दाब वाढल्याने बराच काळ पावसात खंड राहण्याची शक्यता आहे; काही वेळा हलक्या सरी पडू शकतात.

Anil Jadhao 

Pune News: विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची नोंद झाली. मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला. पुढील ५ दिवस विदर्भात पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या इतर भागात पाऊस कमीच राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

माॅन्सून वाटचाल आजही थबकलेली होती. माॅन्सूनची अरबी समुद्रातील शाखा मागील ५ दिवसांपासून तर बंगालच्या उपसागरातील शाखा मागील ३ दिवसांपासून एकाच भागात होता. माॅन्सूनची सिमा आजही मुंबई, अहिल्यानगर, आदीलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. 

माॅन्सूनने आज राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिला. तसेच राज्यातील अनेक भागात पुढील ५ दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही वर्तविली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

विदर्भातील अकोला, चंद्रपूर, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढील ३ दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदीया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात आज तसेच सोमवारी आणि मंगळवारी पावसाचा अंदाज आहे. 

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा पुढील ५ दिवस अंदाज आहे. पावसाचा जोर कमीच राहणार आहे. कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पुढील ३ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र रायगड, पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पुढील ५ दिवस हलक्या सरी काही ठिकाणी पडतील, असा अंदाज हवामानविभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Masala Business Success: अस्सल चवीच्या रिठे मसाल्यांनी मिळविली ग्राहकांची पसंती

Collective Farming Model: एकत्र आलो म्हणून पुढे गेलो...

Maharashtra Drought Crisis: होरपळीच्या सुलतानी झळा

Onion Procurement Irregularities: ‘खरे’ उत्तर मिळेल?

Water Shortage Management: पुणे जिल्ह्यात टंचाईमुळे पाणी नियोजनाला वेग

SCROLL FOR NEXT