Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: विदर्भ, कोकणात मुसळधारेचा अंदाज; माॅन्सून गुजरात पार करून राजस्थानमध्ये; हवामान अनुकूल

Rain Update: माॅन्सूनने आजही देशातील अनेक भागात चाल केली. माॅन्सून गुजरात पार करून राजस्थानमध्ये पोचला. माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये आणखी काही भागात पोहचेल.

Anil Jadhao 

Pune News: माॅन्सूनने आजही देशातील अनेक भागात चाल केली. माॅन्सून गुजरात पार करून राजस्थानमध्ये पोचला. माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये आणखी काही भागात पोचेल. तसेच विदर्भासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील काही भागात पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्याच्या अनेक भागात माॅन्सून सक्रीय आहे. विदर्भातील अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यातही पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरादार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. 

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी पडत आहेत. कोकणात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही मुसळधारेची शक्यता आहे. खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 

माॅन्सूनने आज संपूर्ण गुजरात व्यापला. तसेच संपूर्ण छत्तीसगड आणि झारखंडही व्यापाला आहे. राजस्थानच्या काही भागातही माॅन्सून पोचला आहे. तसेच मध्य प्रदेशचा काही भाग, पूर्व उत्तर प्रदेशचा काही भाग आणि बिहारच्या काही भागात माॅन्सून पोचला आहे. माॅन्सूची सिमा आज बारमेर, जोधपूर, जयपूर, ग्वालिअर, खजुराहो, सोनभद्रा आणि गया भागात होती. 

माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत माॅन्सून राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेशचा आणि बिहारचा उरलेला भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मिर-लाख-गिलगीट-बाल्टीस्तान आणि मुझफ्फराबादच्या काही भागात माॅन्सून पोचेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT