Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : दोन दिवस मुसळधारेचा अंदाज; विदर्भातील अनेक भागात पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता

Rain Alert : हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News :पुणेः राज्याच्या काही भागात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला. तर अनेक भागात पावसाची भूरभूर सुरु होती. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला होता. तर पालघर, ठाणे, कोल्हापूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, अकोला, अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला होता. 

उद्या रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. रत्नागिरी, पालघर, ठाणे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. कोल्हापूर, नगर, धुळे आणि नंदूरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. 

सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक तसेच नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच कोल्हापूर, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला होता. 

मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि नाशिक तसेच पश्चिम विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. बुधवारी विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून मराठवाडा आणि खानदेशात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Swabhimani Motorcycle Rally: ऊसदरासाठी ‘स्वाभिमानी’चे शक्तिप्रदर्शन; मोटारसायकल रॅलीमध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग

Agriculture Drought Management: दुष्काळात पाणी बचतीसह रब्बीचे नियोजन; कृषी विभागाकडून ७ हजार हेक्टरवर चारा उत्पादनाचा प्रस्ताव

Purandar Drought Condition: पुरंदर तालुक्यात दुष्काळाचे संकट; २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्र बाधित

Kharif Crop Damage: मावळमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान; भात, सोयाबीन, भुईमुगाला ७० ते ८० टक्के फटका

Agricultural Infrastructure: शेतीमाल मूल्यवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधांवर भर; नवीन गोदामे, शीतगृहे आणि विकिरण केंद्रे उभारणार: पणनमंत्री जयकुमार रावल

SCROLL FOR NEXT