Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain Update : कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Weather Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र कायम असल्याने राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २७) कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Team Agrowon

Weather News : पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र कायम असल्याने राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २७) कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, तसेच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूरमध्ये अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, रायसेन, मंडला, दुर्ग, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्राच्या मध्य भागातून असलेले पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोडक्षेत्र समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. पश्‍चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी सुरूच असून, धरणांच्या पाणलोटातही संततधार कायम आहे. उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. आज (ता. २७) रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे. तर उर्वरित कोकण, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.


ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम
बंगालच्या उपसागरात उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली कायम असून, ती पश्‍चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याचे संकेत आहेत.




अति जोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा.

जोरदार पाऊस / विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : नंदूरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT