Rain Alert Agrowon
हवामान

Rain Alert: पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update: पूर्व विदर्भात तुफान पाऊस कोसळत असला, तरी उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी आहे. आज (ता. १०) पूर्व विदर्भात अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: पूर्व विदर्भात तुफान पाऊस कोसळत असला, तरी उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर काहीसा कमी आहे. आज (ता. १०) पूर्व विदर्भात अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भासह, कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण पश्चिम बंगाल आणि झारखंड परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यापासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली झारखंड आणि छत्तीसगडकडे सरकत आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अमृतसरपासून, चंडीगड, नजीबाबाद, शहाजहानपूर, कानपूर, दाल्तोंगंज कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड, ओडिशा ते कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पूर्व विदर्भात पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे २८४ मिलिमीटर, कुही येथे २२२, नागपूर येथे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाला आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुधवारी (ता. ९) धुळे येथील कृषी महाविद्यालयात येथे राज्यातील उच्चांकी ३१ अंश तापमानाची नोंदले गेले.

आज (ता. १०) पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, साताऱ्याचा घाटमाथा आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी (ता. ९) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२८.४---२२.७

अहिल्यानगर---२६.८---२१.७

‎‎धुळे---३१.०---२०.६

जळगाव---२९.३---२३.३

जेऊर---२८.०---२०.५

‎‎कोल्हापूर---२५.९---२२.६

‎महाबळेश्‍वर---१९.४---१७.६

मालेगाव---२७.६---२१.६

‎‎नाशिक---२७.२---२२.४

‎निफाड---२८.४---२१.९

‎सांगली---२७.८---२२.६

‎सातारा---२६.७---२२.८

‎सोलापूर---३०.९---२३.५

‎सांताक्रूझ---३०.५---२७.२

डहाणू---३०.०---२५.५

‎रत्नागिरी---२९.९---२५.९

‎छत्रपती संभाजीनगर---२५.८---२२.४

‎धाराशिव---२८.२---२०.२

‎परभणी---निरंक---२३.०

परभणी (कृषी)---२८.४---२३.०

‎‎अकोला---२६.७---२३.८

अमरावती---२४.८---२०.७

‎भंडारा---२५.०---१९.०‎‎

बुलडाणा---२५.६---२१.८

‎ब्रह्मपुरी---२४.२---२२.०

‎चंद्रपूर---२७.०---२२.२

‎गडचिरोली---२६.२---२२.२

‎गोंदिया---२४.४---२२.४

‎नागपूर---२४.२---२२.०

‎वर्धा---२५.०---२१.५

‎वाशीम---२५.०---२१.५

‎यवतमाळ---२५.८---२३.०

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, वर्धा.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Fourth List: कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, १ लाख १५ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Fodder Self Sufficiency: दुष्काळात तोंगलाबादचा ‘चारा स्वयंपूर्णतेचा आदर्श ‘पॅटर्न’

Village Development Committees: स्थापन करा दुष्काळ आकलन, निवारण ग्रामविकास समिती

Farmer Issue: दुष्काळातही शेतकऱ्यांवर अन्याय!

Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!

SCROLL FOR NEXT