Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य

Heavy Rain Alert: राज्यात पाऊस ओसरल्याने कमाल तापमानात वाढ होत पारा तिशीपार गेला आहे. आज (ता. १३) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात पाऊस ओसरल्याने कमाल तापमानात वाढ होत पारा तिशीपार गेला आहे. आज (ता. १३) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎‎ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या सुरतगडपासून, सिकार, ग्वाल्हेर, दाल्तोंगज ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर हरियाना ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

‎‎राज्यात पाऊस ओसरला असून, ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. पावसाने उघडीप देताच राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशीपार गेला आहे. जेऊर आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३४ अंश तापमानाची नोंदले गेले. ‎‎आज (ता. १३) रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच धुळे, नंदुरबार, नाशिकचा घाटमाथा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडिपीसह हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

‎शनिवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२९.८---२२.७

‎अहिल्यानगर---३०.२---२२.६

‎धुळे---३२.०---२०.५

‎जळगाव---३३.८---२४.०

‎जेऊर---३४.०---१९.५

‎कोल्हापूर---२८.१---२२.७

‎महाबळेश्‍वर---२०.३---१७.७

‎मालेगाव---३१.४---२१.६

‎नाशिक---२८.८---२२.६

‎निफाड---३०.०---२२.२

‎सांगली---३०.६---२२.२

‎सातारा---२९.३---२२.४

‎सोलापूर---३३.६---२३.८

‎सांताक्रूझ---३२.१---२७.५

‎डहाणू---३२.२---२४.७

रत्नागिरी---३०.५---२४.७

‎छत्रपती संभाजीनगर---३०.६---२२.६

‎धाराशिव---२९.२---२१.०

‎परभणी---३१.८---२३.९

‎परभणी (कृषी)---३२.५---निरंक

‎अकोला---३३.२---२५.३

‎अमरावती---३२.२---२२.८

‎भंडारा---३१.०---२२.०

बुलडाणा---३०.०---२२.६

‎ब्रह्मपुरी---३३.८---२६.०

‎चंद्रपूर---३४.०---२४.४

‎गडचिरोली---३१.०---२४.०

‎गोंदिया---३१.५---२५.२

‎नागपूर---३३.३---२५.८

‎वर्धा---३३.५---२५.०

‎वाशीम---२९.६---२२.८

‎यवतमाळ---३१.६---२३.६

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

‎रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.

‎विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

‎नंदुरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Seed Coating : स्मार्ट सीड कोटिंग तंत्रज्ञानामुळे उत्पादनात ३७ टक्क्यांपर्यंत वाढ; आयसीएआरचा दावा

Pigeon Pea Cultivation: भरघोस उत्पादनासाठी तूर पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

Agriculture Water Crisis: कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून कर्नाटकला पाणी बहाल : शेट्टी

Bird Menace Crops: पाखरांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण

Cooperative Marketing Federation: ‘पणन ’च्या वारंवार होणाऱ्या बैठकांवर राज्य सरकारचे निर्बंध

SCROLL FOR NEXT