Rain Forecast Agrowon
हवामान

Monsoon 2025: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain: मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या विविध भागांत हलका ते जोरदार पाऊस कोसळला. आज (ता. ९) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

अमोल कुटे

Pune News: मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्याच्या विविध भागांत हलका ते जोरदार पाऊस कोसळला. आज (ता. ९) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, पूर्व विदर्भात जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

दक्षिण पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यापासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली झारखंड आणि छत्तीसगडकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा भटिंडापासून, रोहतक, कानपूर, दाल्तोंगंज, कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरात आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मंगळवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पूर्व विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे २३० मिलिमीटर, तर अर्जूनीमोरगाव येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. गेली काही दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर सुरू असलेला पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र तुरळक ठिकाणी जोरदार पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवारी सोलापूर येथे पावसाची दडी कायम असल्याने राज्यातील उच्चांकी ३१ अंश तापमानाची नोंदले गेले.

आज (ता. ९) रायगड, पुणे घाटमाथा, नाशिकचा घाटमाथा आणि चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२८.६---२२.८

अहिल्यानगर---२७.०---२२.३

‎‎धुळे---३०.०---२०.३

जळगाव---२९.८---२३.०

जेऊर---३०.५---२०.५

‎‎कोल्हापूर---२६.६---२२.५

‎महाबळेश्‍वर---१९.५---१७.९

मालेगाव---२६.८---२१.२

‎‎नाशिक---२६.४---२२.१

‎निफाड---२७.०---२१.९

‎सांगली---२८.७---२२.७

‎सातारा---२६.२---२१.८

‎सोलापूर---३१.०---२४.०

‎सांताक्रूझ---३०.४---२७.६

डहाणू---२९.१---२५.५

‎रत्नागिरी---३०.४---२५.५

‎छत्रपती संभाजीनगर---२५.८---२२.०

‎धाराशिव---२९.१---निरंक

‎परभणी---२६.३---२२.६

परभणी (कृषी)---२६.५---२२.२

‎‎अकोला---२६.९---२२.८

अमरावती---२४.८---२०.६

‎भंडारा---२६.०---२०.०‎‎

बुलडाणा---२५.२---२०.८

‎ब्रह्मपुरी---२५.८---२१.६

‎चंद्रपूर---२८.२---२३.०

‎गडचिरोली---२७.४---२२.६

‎गोंदिया---२५.०---२२.२

‎नागपूर---२४.५---२३.०

‎वर्धा---२५.०---२२.४

‎वाशीम---२४.८---२०.६

‎यवतमाळ---२४.४---२१.०

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, चंद्रपूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Seed Coating : स्मार्ट सीड कोटिंग तंत्रज्ञानामुळे उत्पादनात ३७ टक्क्यांपर्यंत वाढ; आयसीएआरचा दावा

Pigeon Pea Cultivation: भरघोस उत्पादनासाठी तूर पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

Agriculture Water Crisis: कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून कर्नाटकला पाणी बहाल : शेट्टी

Bird Menace Crops: पाखरांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण

Cooperative Marketing Federation: ‘पणन ’च्या वारंवार होणाऱ्या बैठकांवर राज्य सरकारचे निर्बंध

SCROLL FOR NEXT