Weekly Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Rain : कोकणात पावसाचा जोर वाढला असून, राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.

अमोल कुटे

Pune News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) आठवडाभरापासून अडखळलेली वाटचाल सुरू झाली आहे. कोकणात पावसाचा जोर वाढला असून, राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २१) विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर कोकण आणि पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गुरूवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. पालघर येथे १३० मिलिमीटर तर रायगडमधील कर्जत येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात विदर्भाच्या उत्तर भागासह आणि खानदेशात मॉन्सूनची प्रतीक्षा आहे.

राज्यात ढगाळ हवामान होत असून, हलक्या सरी सुखावून जात आहेत. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. पावसाच्या हजेरीने विदर्भात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. गुरूवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३८.७ अंश तापमानाची नोंद झाली.

आज (ता. २१) विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गुरूवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (मिमी) :

कोकण : पालघर १३०, कर्जत ११०, डहाणू, वाकवली प्रत्येकी ९०, विक्रमगड, गुहागर प्रत्येकी ८०, अलिबाग, पेण, दापोली, खेड, श्रीवर्धन, तळा प्रत्येकी ७०, सुधागड, भिवंडी, म्हसळा, जव्हार, वसई प्रत्येकी ६०, चिपळूण, मुरूड, माथेरान प्रत्येकी ५०, खालापूर, संगमेश्वर, वाडा, रोहा प्रत्येकी ४०, ठाणे, मुखेडा, तलासरी, मुरबाड, कुलाबा, सावर्डे, उरण, माणगाव प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर, धुळे, ओझरखेडा प्रत्येकी ३०, इगतपुरी २०, शाहूवाडी, गगनवबावडा, वेल्हे, नाशिक, बार्शी, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी १०.

मराठवाडा : मंथा, धाराशिव, नायगाव खैरगाव प्रत्येकी १०.

विदर्भ : भामरागड, देवरी, भंडारा प्रत्येकी ३०, आरमोरी, ब्रह्मपूरी, चंद्रपूर, अर्जुनीमोरगाव, तिरोडा प्रत्येकी २.

मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

अमरावती, यवतमाळ, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा.

वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

नांदेड, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT