Monsoon 2023 Agrowon
हवामान

Monsoon 2023 : राज्यात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra rain update : आज कोकणासह संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

Dhananjay Sanap

IMD rainfall alert : राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसानं सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं पिकांना काहीसा आधार मिळाला आहे. आज कोकणासह संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, अकोला, नागपूर, गडचिरोली, चंद्रपुर, भंडार गोंदिया अमरावती जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

तसेच मराठवाड्यातील संभाजी नगर. जालना, परभणी, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुर, नगर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर कोंकणातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यासोबतच उद्या ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी तर पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

राज्यातील कोंकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस पडला.  त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागात जोरदार सरीनी हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्य स्वरूपाच्या सरी बसरल्या. सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या. खानदेशात काही मंडळात पावसाने हजेरी लावली. विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस झाला. त्यासोबच विदर्भातील बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. काही भागात नदी नाल्यांना पाणी आलं. तर काही भागात अतिवृष्टी झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT